Khamgaon APMC logo खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.

ता. खामगांव, जि. बुलडाणा - ४४४ ३०३ (महाराष्ट्र)

शेतकरी नोंदणी

ऑनलाईन नोंदणी चे नियम व अटी

१. आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक आहेत.
    एक आधार कार्ड वर एकदाच नोंदणी करता येईल.
    एक मोबाईल क्रमांकावरून एकदाच नोंदणी करता येऊ शकते.
    (आपला मोबाईल क्रमांक दुसर्‍याच्या नोंदणीस वापरू नये. भविष्यात अडचणी येऊ शकतात.)
२ . सन २०२१ -२२ या चालू वर्षाचा कापूस पेरा नोंद असलेला व प्रमाणित केलेला ७/१२ सोबत ठेवावा .
३ . IFSC Code असलेल्या बँकचे खाते आवश्यक आहे. पासबुक अथवा कॅन्सल केलेला चेक चा फोटो अपलोड करावा.
    बँकेचे खाते आधारशी लिंक केलेले असावे.
    जनधन योजनेचे पासबुक अथवा KYOSK खाते असलेले पासबुक जोडू नये.
४ . नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर कापूस विक्रीची दिनांक व ठिकाण टेक्स्ट मेसेजने (SMS) कळविण्यात येईल अथवा बाजारसमितीच्या वेबसाइटवर यादी प्रसिद्ध होईल.
५ . कापूस विक्री वेळी विक्री केंद्रावर शेतकरी अथवा त्याचा वारसास उपस्थित राहावे लागेल.
६ . कापूस विक्रीच्या दिनांकास अथवा पुढील दोन दिवसात कापूस विक्रीसाठी न आणल्यास यादीतील नांव रद्द करण्यात येईल.
७ . भविष्यात सी.सी.आय द्वारे कापूस खेरेदी बंद झाल्यास केलेली नोंदणी आपोआप रद्द होईल. त्यास बजार समिती जबाबदार राहणार नाही.
८ . सी.सी.आय. च्या नियमाप्रमाणे एफ. ए. कयू. दर्जाचाच कापूस केला जाईल.
९ . नोंदणी केलेली माहिती व वास्तविक दस्तावेजात तफावत असल्याचे निदर्शनास आल्यास नोंदणी रद्द करण्याचे पूर्ण अधिकार बाजार समिती प्रशासन व सी.सी.आय. प्रशासनास राहतील.
१०. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास कार्यालयीन वेळेत बाजार समितीशी वेबसाईटवर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
११ . कापूस विक्री नोंदणी व विक्री व्यवस्थापन साठी वेबसाईट तयार करण्यात आली असल्याने बाजार समिती मध्ये प्रत्यक्ष येऊन चौकशी करणे टाळावे.

ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

  • मोबाईल नंबर टाकून Send OTP बटन ला क्लिक करा.
  • मोबाईल वर OTP आल्यानंतर तो OTP च्या बॉक्स मध्ये टाकून Submit बटन ला क्लिक करा.
  • त्यानंतर शेतकरी नोंदणी फॉर्म येईल, तो व्यवस्थित भरा.

मोबाईल नंबर :
OTP टाका: