प्रस्तावना
कृषि उत्पन्न बाजार समिती, खामगांव ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. खामगांव बाजारसमितीची स्थापना जवळ जवळ ११२ वर्षांपूर्वी झाली असून कापूस एकाधिकार योजनेपूर्वी म्हणजे १९७२ पूर्वी खामगांव येथील कापसाची बाजारपेठ फार मोठी होती.
आशिया खंडात ज्या नावाजलेल्या कापसाच्या बाजारपेठा होत्या त्यामध्ये खामगाव बाजारपेठेचा समावेश होता. इतकेच नव्हे तर खामगाव येथे कापसाला देण्यात येणाऱ्या भावावर इतर बाजारपेठेचे बाजारभाव अवलंबून होते. इतर बाजारपेठेमध्ये येणाऱ्या कापसाचे बरोबरीत किंवा त्यापेक्षा जास्त खामगाव बाजार पेठेत कापसाची आवक राहत होती. परंतु सध्या शेतकरी सोयाबीन पिकांकडे वळल्यामुळे कापूस आवक तुलनात्मक दृष्ट्या कमी झाली आहे.
स्थापना
खामगांव कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना कापूस बाजारसमिती म्हणून माजी हैदराबाद रेसिडेन्सी ऑर्डर नं ६९ दिनांक ०१/०४/१८९७ अन्वये झालेली आहे आणि कापूस बाजाराचे प्रत्येक्ष कामकाज दिनांक ०१/०४/१८९८ पासून सुरु झाले आहे.
यानंतर कापूस व कृषि उत्पन्न बाजार समिती या नावाने मध्यप्रांत व बेरार ऍग्रीकलचरल प्रोड्युस मार्केट ऍक्ट १९३५ च्या कमिशनरचे नोटिफिकेशन नं. सीओपी - ४७ खामगांव दिनांक ०७/०६/१९५९ पासून स्थापना करण्यात आली. दिनांक ७ जून १९५९ च्या पूर्वी ह्या समितीच्या नियंत्रणाखाली फक्त कापूस ह्या शेतीमालाची खरेदी विक्रीचे व्यवहार होत असत. दिनांक ७ जून १९५९ च्या नंतर कापसा व्यतिरिक्त इतर सर्व धान्य शेतीमालाचे खरेदी विक्री व्यवहारही ह्या बाजार समितीच्या नियंत्रणाखाली आले.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर शासनाने संपूर्ण राज्यासाठी एकसूत्रीपणा आणण्याच्या दृष्टिकोनातून “महाराष्ट्र्र शेतीच्या उत्पन्नाची खरेदी विक्री (नियम) अधिनियम १९६३” हा नवीन कायदा शासनाने दिनांक २५/०५/१९६७ पासून महाराष्ट्र राज्यात लागू केला आणि आजही बाजार समिती सदरहू कायद्याने कार्यरत आहे. भाजीपाला व फळफळावळे ह्या शेतीमालाचे नियमन ह्या बाजारसमितीने केलेले आहे परंतु सध्या नियंत्रण केलॆले नाही.
सध्या खामगांव कृषि उत्पन्न बाजार समिती उत्पन्न गटानुसार “अ” वर्गात येते.
बाजार आवर
खामगाव बाजारसमितीचे मुख्य बाजार आवर खामगांव येथे असून बाजार आवाराचे एकूण क्षेत्रफळ २१ एकराचे (८ हेक्टर २० आर ) आहे. ह्या बाजारसमितीचे कार्यक्षेत्र खामगाव तालुक्यापुरते मर्यादित असून ह्यात १४८ गावांचा समावेश आहे. बाजार आवाराची जागा बाजारसमितीच्या मालकीची असून तिच्या ताब्यात आहे. मुख्य बाजार आवार खामगाव सहाराच्या मुख्य मध्य मार्गात असून नॅशनल हायवे नं . ६ ला लागून आहे. खामगाव रेल्वे स्टेशन व बस स्टॅन्ड १ (एक फर्लांग) अंतरावर आहे.
उप बाजार
खामगाव बाजार समितीचे खालील ठिकाणी उप बाजार आहेत.
1) बोरी-आडगाव
2) पिंपळगाव राजा
3) जनुना
हर्रास पद्धत ( लिलाव पद्धत)
बाजारसमितीच्या यार्डात सर्वसाधारण वर्षभर शेतीमालाची आवक सातत्याने येते. विक्रीसाठी आलेल्या सर्व शेतीमाल ढिगानुसार किंवा पोत्याप्रमाणे विक्रीस ठेवण्यात येतो. लिलावाच्या वेळी जास्तीत जास्त बोली बोलणाऱ्यास तो माल विक्री करण्यात येतो. भाव हे प्रति क्विंटल ठरविले जातात.
सर्व शेतीमालाची विक्री उघड लिलाव पद्धतीने असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालास जास्तीत जास्त भाव मिळतो.
खामगांव कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कार्यक्षेत्रात बाहेरील शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आवक असूनही आवक झालेल्या शेतीमालाची मोजमाप त्याच दिवशी पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा चुकार देखील त्याच दिवशी मिळतो.
तसेच चोख वजन मापामुळे बाजार समिती प्रति शेतकऱ्यांचा विश्वास वाढत आहे.
शेतकरी नोंदणी